नोकरीच्या आमिषाने फसवणूक प्रकरणी प्रकाश राणे याचा जामीन अर्ज फेटाळला

0
5

सरकारी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक प्रकरणातील संशयित आरोपी निवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी प्रकाश राणे याचा जामीन अर्ज काल येथील पणजी प्रथम श्रेणी न्यायालयाने फेटाळला.

प्रकाश राणे याने नोकरीचे आमिष दाखवून 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार पणजी पोलीस स्थानकात नोंदविण्यात आली आहे. गेल्या रविवारी प्रकाश राणे याला अटक करण्यात आली होती. तो आजारी असल्याच्या तक्रारीनंतर त्याला उपचारार्थ इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. तो इस्पितळात असल्याने पोलिसांनी अद्याप त्याची चौकशी केलेली नाही.

दरम्यान, सरकारी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक प्रकरणातील एक संशयित आयआरबी कर्मचारी सागर नाईक याच्याविरोधात फोंडा पोलिसांनी पोलीस खाते आणि आयआरबी कमांडर यांच्याकडे अहवाल सादर केला आहे. शिक्षिकेच्या नोकरीचे आमिष दाखवून 15 लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणात सागर नाईकला अटक करून त्याची जामिनावर सुटका झाली आहे.