नोकरभरतीत गोवेकरांना प्राधान्य द्या : नाईक

0
7

केंद्र सरकारच्या गोव्यातील खात्यांनी आपल्या अंतर्गत येणारी रिक्त पदे भरताना गोव्यातील युवक-युवतींचा विचार करावा व त्यांना नोकर्‍या द्याव्यात, अशी इशारावजा सूचना उत्तर गोवा खासदार तथा केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी काल केली. केंद्र सरकारच्या विविध खात्यांतील गोव्यात असलेल्या कार्यालयांत वेळोवेळी नोकरभरती होत असून, ती करताना गोव्यातील उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी नाईक यांनी केली. केंद्र सरकारच्या काही एजन्सी ही पदे भरताना गोमंतकीयांना पूर्णपणे डावलत असल्याचे आढळून आलेले आहे. पोस्ट, टेलिग्राम खात्यात, तसेच गोवा शिपयार्डमध्ये भरती प्रक्रिया राबवताना गोमंतकीय उमेदवारांना पूर्णपणे डावलण्यात येत असल्याचे आढळून आले आहे, असेही नाईक यांनी नमूद केले. या खात्यांमध्ये काम करण्यासाठी आवश्यक तेवढे कौशल्य राज्यातील उमेदवारांमध्ये असताना त्यांना का डावलले जात आहे, असा सवालही नाईक यांनी केला.