‘नीट’ आणि ‘जेईई’ परीक्षा ठरल्यानुसारच

0
138

>> सर्वोच्च न्यायालयाने विरोधी याचिका फेटाळली

देशातील वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी ‘नीट’ परीक्षा तसेच अभियांत्रिकीसाठीची ‘जेईई’ परीक्षा सध्याच्या कोरोनाच्या कहरामुळे रद्द करावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने काल फेटाळून लावली. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) द्वारे घेण्यात येणार असलेल्या या दोन्ही परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दर्शविला आहे.

‘नीट’ व ‘जेईई’ परीक्षा यंदा दोन वेळा पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. ‘नीट’ परीक्षा आता १३ सप्टेंबरला होणार असून ‘जेईई मेन’ परीक्षाही सप्टेंबरमध्येच होणार आहे. यावेळी सरकारची बाजू मांडताना एनटीएचे वकील तुषार मेहता यांनी या परीक्षा सर्वतोपरी सुरक्षात्मक उपाययोजना करून घेतल्या जातील अशी ग्वाही दिली.