निवडणूक रोख्यांची एसआयटी चौकशी करा

0
8

निवडणूक रोख्यांचा मुद्दा पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. कॉमन कॉज आणि सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन या स्वयंसेवी संस्थांनी या रोख्यांच्या व्यवहारांची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. त्यावर 22 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. दोन्ही स्वयंसेवी संस्थांच्या वतीने वकील प्रशांत भूषण यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये दोन मागण्या करण्यात आल्या आहेत. न्यायालयाने ही याचिका स्वीकारली असून, या संदर्भातील अन्य याचिकांवरही एकत्रित सुनावणी होणार आहे.