नितीशकुमारांनी बोलावली विरोधी पक्षांची बैठक

0
5

येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पाटणा येथे विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात चर्चा होणार आहे. लोकसभेच्या 450 जागांवर विरोधकांकडून भाजपविरोधी एकच उमेदवार देण्यात येण्यावर चर्चा होणार आहे. पाटणामध्ये होणाऱ्या बैठकीत 3 राष्ट्रीय पातळीवरील पक्ष, 12 राज्यस्तरीय पक्ष आणि 4 छोटे पक्ष सामील होणार आहेत. विरोधी आघाडीत समन्वय समिती स्थापन करण्याची चर्चा सुरू आहे. या समितीकडे किमान समान कार्यक्रम आणि जागा वाटपाचा वाद सोडविण्याची जबाबदारी देण्यात येईल. काँग्रेस, आप आणि सीपीएम सपा, टीएमसी, शिवसेना (यूबीटी), एनसीपी, जेएमएम, सीपीआय, डीएमके, नॅशनल कॉन्फरन्स, मुस्लिम लीग, एमडीएमके हे पक्ष बैठकीला उपस्थित राहणार आहेत.