धारबांदोड्यात बसला अपघात; चालक ठार

0
4

दुर्गिणी-धारबांदोडा येथे राष्ट्रीय महामार्गावर काल संध्याकाळी आंतरराज्य वाहतूक करणारी खासगी व्होल्वो बस कलंडल्याने झालेल्या भीषण अपघातात बसचालक जागीच ठार झाला. तसेच बसमधील 25 प्रवासी जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही बस गोव्यातून हैदराबाद येेथे जात होती. भरधाव वेगामुळे बसला अपघात झाल्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यात सहभाग घेतला. बसखाली चिरडल्याने बसचालक शिवराम रेड्डी (46 वर्षे) याचा जागीच मृत्यू झाला. अग्निशामक दलाचे जवान आणि स्थानिकांना बसखाली चिरडलेल्या एका महिलेला बाहेर काढले. ती गंभीररित्या जखमी झाली आहे. या अपघातात सुमारे 25 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या बसमध्ये 40 प्रवासी होते.