गेल्या दोन दिवसांपासून दैनंदिन नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत झपाट्याने घट होत आहे. गेल्या 24 तासांत देशात 7 हजार 633 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्याआधी सोमवारी नवे 9 हजार 111 रुग्ण, रविवारी 10,093 आणि शनिवारी 10,753 नवीन रुग्णसंख्या नोंदवण्यात आली. नव्या रुग्णांमध्ये हळूहळू घट होत असल्याने दिलासा मिळाला आहे.
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गामुळे 11 जणांचा मृत्यू झाला. 7 हजार 633 नव्या कोरोना रुग्णांसह, कोरोनाच्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 61 हजार 233 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासांत 6 हजार 702 जण कोरोनामुक्त
झाले.
राज्यात नव्या रुग्णांत किंचित वाढ
राज्यात गेल्या 24 तासांत 839 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यात नवे 88 कोरोनाबाधित आढळून आले. नव्या रुग्णांपैकी 4 जणांना इस्पितळात दाखल केले आहे. गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्या घटली होती, त्यात काल पुन्हा किंचित वाढ झाली. राज्यात 24 तासांत 140 रुग्ण कोरोनामुक्त झाले. परिणामी सक्रिय रुग्णांचा आकडा सहाशेच्या खाली आला असून, सध्या राज्यात 556 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.