दीपश्री सावंतविरुद्ध आणखी 1 गुन्हा नोंद

0
4

दीपश्री सावंत गावस हिच्याविरोधात नोकरी घोटाळा प्रकरणी काल पणजी पोलिसांनी आणखी एक गुन्हा नोंद केला.
संशयित दीपश्री प्रशांत महातो ऊर्फ दीपश्री सावंत (रा. घारसे टॉवर्स, पणजी, मूळ रा. नादोडा) हिने बार्देश तालुक्यातील एका व्यक्तीला लेखा खात्यात लेखा अधिकाऱ्याची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून सुमारे 10 लाख 35 हजार रुपयांना गंडा घातला. 2018 मध्ये दीपश्रीने त्याच्याकडून 10 लाख 35 हजार रुपये रोख स्वरूपात घेतले होते, असे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर पणजी पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा नोंद करून तपास कामाला सुरूवात केली आहे. त्च्यािविरोधात नोकरीच्या आमिषाने फसवणूक प्रकरणी यापूर्वी अनेक गुन्हे नोंद झाले आहेत.