दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कोरोनाबाधित

0
15

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांना ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या नमुन्याचा अहवाल येण्यासाठी आणखी दोन-तीन दिवस लागू शकतात. त्यांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांत जो कोणी आमच्या संपर्कात आला, कृपया त्यांनी स्वत:ला आयसोलेट करून आपली चाचणी करून घ्यावीअसे आवाहन त्यांनी केले आहे.