दहावी परीक्षा ः याचिकेवर हस्तक्षेपास कोर्टाचा नकार

0
240

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दहावीची परीक्षा रद्द करण्यासाठीच्या याचिकेत हस्तक्षेप करून अंतरिम दिलासा देण्यास काल नकार दिला. न्यायालयाने राज्य सरकार आणि शालान्त मंडळाला विद्यार्थी आणि परीक्षा केंद्रातील कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसंबंधी योग्य उपाय योजना करण्याची सूचना केली.

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर एप्रिल २०२० या महिन्यात होणारी दहावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. राज्य सरकारने केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात मान्यता घेतल्यानंतर परीक्षा २१ मे पासून घेण्याचे जाहीर केले आहे. शिक्षण मंडळाने या परीक्षेसाठी सुरक्षा उपाय योजनांची खास व्यवस्था केली आहे. परराज्यातून येणार्‍या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळी व्यवस्था जाहीर केली आहे.