दहावीत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेश घेता येणार

0
9

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वर्ष 2022-23 च्या दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण होणारे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी अकरावीच्या वर्गात प्रवेश घेऊ शकतात, असे मंडळाने जाहीर केले आहे.
गोवा शिक्षण मंडळाने याबाबतची माहिती संलग्न माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयांना दिली आहे. शिक्षण मंडळाने 17 ऑगस्ट 2022 रोजी एका परिपत्रकाद्वारे दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेला विद्यार्थी अकरावीच्या वर्गात प्रवेश घेऊ शकतो असे जाहीर केले होते. त्या परिपत्रकांची कार्यवाही आगामी शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून केली जात आहे, असे मंडळाने म्हटले आहे. दहावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांचा अकरावी वर्गातील निकाल जाहीन केला जाणार आहे.