दहशतवादाला जगात स्थान नाही

0
8

>> मोदींची नेतन्याहूंशी चर्चा; इस्रायलला पाठिंबा

इस्रायलने दक्षिण बैरुतमधील हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेच्या मुख्यालयावर शुक्रवारी केलेल्या हल्ल्यात हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नरसल्लाह ठार झाला होता. त्यामुळे एका मोठ्या दहशतवाद्याचा अंत झाल्याचे म्हटले जात आहे; परंतु अद्यापही येथे चकमकी सुरूच आहेत. या पार्श्वभूमीवर पश्चिम आशियातील वाढत्या तणावाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी चर्चा केली.

पश्चिम आशियातील अलीकडील घडामोडींबद्दल आपण पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी बोललो. आपल्या जगात दहशतवादाला स्थान नाही. प्रादेशिक वाढ रोखणे आणि सर्व ओलिसांची सुरक्षित सुटका सुनिश्चित करणे महत्वाचे आहे. शांतता आणि स्थिरता लवकरात लवकर प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना भारताचा नेहमीच पाठिंबा असेल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले.

दरम्यान, गेल्या आठवड्याभरात इस्रायलने हिजबुल्लाहविरोधात आक्रमक कारवाई केली आहे. त्यामुळे हसन नसराल्लहासह सात प्रमुख नेते या हल्ल्यांमध्ये मारले गेले आहेत. दक्षिण इस्रायलवर अचानक झालेल्या हल्ल्यानंतर गाझामध्ये हिजबुल्लाह संघटना हमासबरोबर सैन्यांत सामील झाली होती. त्यामुळे इस्रायलने हिजबुल्लाह देखील लक्ष्य केले आहे. इस्रायलच्या हल्ल्यात मारला गेलेला नाबिल कौक हा एक अनुभवी कमांडर होता. तो 1980 च्या दशकात हिजबुल्लाहमध्ये सामील झाला होता. प्रत्युत्तरादाखल हिजबुल्लाहने उत्तर इस्रायलवरील क्षेपणास्त्र हल्ले सुरूच ठेवले आहेत. मात्र, त्यापैकी बहुसंख्य क्षेपणास्त्रे आधीच नष्ट करण्यात आली किंवा ती निर्मनुष्य जागेत पडली.