तिसऱ्या आघाडीत सामील होणार नाही : पटनायक

0
1

चार दिवसांच्या नवी दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी चार मागण्या मांडल्या. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पटनायक यांनी तिसऱ्या आघाडीत सामील होणार नसल्याचे स्पष्ट केले. माझ्या दृष्टीने तिसऱ्या आघाडीची कोणतीही शक्यता नाही. तसेच बिजू जनता दल (बीजेडी) नेहमीप्रमाणेच पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत एकट्याने उतरेल. तिसऱ्या आघाडीत आपण सामील होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असेही पटनायक म्हणाले.