डोनाल्ड ट्रम्प यांना अटक आणि सुटका

0
20

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना गुरुवारी जॉर्जिया राज्यात अटक करण्यात आली. 2020 साली झालेली अध्यक्षपदाची निवडणूक उलथवून लावण्याचा कट रचणे आणि फसवणूक असे गंभीर आरोप ट्रम्प यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. अटक झाल्यावर तुरुंगात ट्रम्प यांचा कैद्यासारखा फोटो देखील काढण्यात आला. मात्र वीसच मिनिटांत त्यांना 2 लाख डॉलर्सच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला आणि मग तिथून ते आपल्या न्यू जर्सीमधील निवासस्थानाकडे रवाना झाले.

गेल्या पाच महिन्यामध्ये ही चौथा गुन्हा दाखल झाला असून, ज्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना दोषी ठरवण्यात आले आणि गुन्हेगार म्हणून न्यायालयात हजर व्हावे लागले आहे. न्यायालयाने ट्रम्प यांना 25 ऑगस्टपर्यंत शरणागतीची मुदत दिली होती. त्यानंतर ट्रम्प गुरुवारी फुल्टन काउंटी तुरुंगात आले आणि त्यांनी शरणागती पत्करली. शरणागती पत्करल्यानंतर 20 मिनिटांसाठी ते तुरुंगात होते. या दरम्यान त्यांचा मग शॉट म्हणजे कैद्यासारखा फोटो देखील काढण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत हा फोटो देखील शेअर केला आहे. त्यानंतर हर्ट्सफील्ड जॅक्सन आंतरराष्ट्रीय विमानतळावर ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावत दोषी नसल्याचे सांगितले.

2020 च्या निवडणुकीत जॉर्जिया राज्यातील मते आपल्या बाजूने वळवण्यासाठी तेथील अधिकाऱ्याला फोन केला होता. त्या फोन कॉलचा पहिला रिपोर्ट वॉश्गिंटन पोस्ट या स्थानिक वृत्तपत्राने प्रसिद्ध केला. त्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. या सगळ्या प्रकरणामध्ये डोनाल्ड ट्रम्प अडचणीत असून, त्या पार्श्वभूमीवर त्यांना अटक करण्यात आली.