डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कृती दलाची स्थापना

0
7

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर, निवासी डॉक्टर, इंटर्न, विद्यार्थी, नर्स, प्रशिक्षणार्थी नर्स आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी कृती दलाची स्थापना काल करण्यात आली.

कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालयातील महिला डॉक्टरवरील बलात्कार व खून प्रकरणानंतर डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्याचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे देशभरात डॉक्टरांनी संप करून डॉक्टर व वैद्यकीय क्षेत्रातील इतरांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने देशातील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. गोमेकॉच्या निवासी डॉक्टरांनी आंदोलन करून सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी केली होती. तसेच गोमेकॉतील निवासी डॉक्टरांच्या संघटनेने आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनाही निवेदन सादर केले होते.
गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांच्या नेतृत्वाखालील कृती दलामध्ये 27 सदस्य आहेत. या कृती दलामध्ये विविध विभागांचे प्रमुख व इतरांचा समावेश आहे.