झुवारी पुलाचे उर्वरित काम या महिन्यात पूर्ण होणार

0
8

नव्या केबल स्टेड झुवारी पुलाच्या उर्वरित चारपदरी मार्गाचे काम चालू महिन्याच्या म्हणजेच सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती काल सूत्रांनी दिली. सप्टेंबर अखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार असून पुलाचा हा उर्वरित चारपदरी मार्ग नोव्हेंबर अथवा डिसेंबरपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. पुलाच्या ह्या उर्वरित चारपदरी मार्गाचे काम पूर्ण करून हे मार्ग कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर 2023 पर्यंत वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांनी गेल्या पावसाळी अधिवेशनात बोलताना स्पष्ट केले होते.

ह्या आठपदरी केबल स्टेड पुलाच्या पहिल्या चारपदरी मार्गाचे काम पूर्ण करून गेल्या डिसेंबर महिन्यात हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. आता उर्वरित चारपदरी मार्गासाठीचे काम अंतिम टप्प्यात असून हे काम पूर्ण करून कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर 2023 पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याने स्पष्ट केले आहे.