झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात 66.48 टक्के मतदान

0
5

झारखंड विधानसभेच्या पहिल्या टप्प्यात 15 जिल्ह्यांतील 43 मतदारसंघांसाठी 66.48 टक्के मतदान झाले.
झारखंडमध्ये विधानसभेच्या एकूण 81 जागा असून, एकूण दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 683 उमेदवार आपले नशीब आजमावत होते. पहिल्या टप्प्यात 43 जागांवरील मतदान पूर्ण झाले असून, आता उर्वरित 38 मतदारसंघांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होईल. त्यानंतर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.