ज्येष्ठ चित्रकार ललिता लाजमी यांचे निधन

0
17

ज्येष्ठ चित्रकार ललिता लाजमी यांचे काल निधन झाले. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जहांगीर निकोल्सन आर्ट फाऊंडेशनने याबाबतची माहिती दिली. ललिता या अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक गुरु दत्त यांच्या बहीण होत्या. 17 ऑक्टोबर 1932 रोजी ललिता यांचा जन्म झाला. त्यांचे बालपण मुंबईत गेले. 1961 मध्ये ललिता यांनी त्यांच्या चित्रांचे स्वतंत्र प्रदर्शन आयोजित करण्यास सुरुवात केली.