झारखंड, आध्रंप्रदेश आणि आसपासच्या भागातील कमी दाबाचा पट्टा आणि चक्रीवादळीमुळे राज्यात आगामी चार दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ११ ते १३ या तीन दिवसांच्या काळासाठी केशरी अलर्ट जारी केला आहे.
आंध्रप्रदेश, ओडिसा या राज्यातील किनारी भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. यामुळे गोव्यातील काही भागांत चोवीस तासांत १२ सेंटीमीटर पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत पणजी आणि दाबोळी येथे प्रत्येकी २ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यभरात अंदाजे १ इंच पावसाची नोंद झाली आहे. मुरगाव येथे १.५६ इंच, म्हापसा येथे १.४२ इंच, ओल्ड गोवा येथे १.४० इंच पावसाची नोंद झाली आहे.