>> मुख्यमंत्र्यांचा दावा; महसुलात ४० टक्के वाढ
राज्याला जीएसटीवरील भरपाई मिळणे बंद झाले, तर राज्याच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा गंभीर परिणाम होण्याचे चित्र उभे केले जात असले, तरी राज्यावर त्याचा तेवढा गंभीर परिणाम होणार नसून, घाबरण्याची गरज नसल्याचे मत काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत व्यक्त केले.
२०२१-२२ या वर्षाच्या तिमाहीत राज्याच्या महसुलात ४० टक्के एवढी वाढ झाली आहे. २०१८ ते २०२१ या आर्थिक वर्षात गोव्याचे जीएसटी भरपाईवरील अवलंबित्व हे अवघे ८.८८ टक्के एवढे होते, तर चालू २०२२ या वर्षी ते ११.७९ टक्के एवढे आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.