जिल्हा पंचायत निवडणूक लांबणीवर

0
149

>> राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय

कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रसारामुळे जगभरात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने रविवार दि. २२ मार्चची जिल्हा पंचायत निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त आर. के. श्रीवास्तव यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली.
दि. २२ रोजीची निवडणूक २४ अशी पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, त्यासंबंधीची अधिसूचना काढण्यात आली नव्हती, असे ते म्हणाले. आता राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निर्माण झालेली आणीबाणीसारखी परिस्थिती लक्षात घेऊन ही निवडणूक पुढे ढकलली आहे. निवडणुकांची पुढील तारीख गोवा सरकार राज्य निवडणूक आयोगाशी चर्चा करून ठरवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, जिल्हा पंचायतीच्या निवडणुकांची प्रचारापर्यंतची प्रक्रिया वैध असून निवडणुकांची तारीख तेवढी पुढे ढकलण्या आली असल्याचे पंचायत सचिवानी स्पष्ट केले आहे.
राज्य निवडणूक आयुक्त श्रीवास्तव म्हणाले की, शुक्रवार दि. २० रोजी (काल) संध्याकाळी ५ वाजता जाहीर प्रचाराची सांगता झाली. आता जिल्हा पंचायत निवडणूक कधीही घेतली तरी यापुढे कुणालाही जाहीर प्रचार करता येणार नाही.