जानेवारीत पर्पल महोत्सव

0
28

समाजकल्याण खात्यातर्फे येत्या जानेवारी महिन्यात गोव्यात दिव्यांगजनांसाठी आंतरराष्ट्रीय पर्पल महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. काल समाजकल्याण खात्याच्या वतीने ही माहिती देण्यात आली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सक्षम नेतृत्वाखाली हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई व राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी कंबर कसली आहे. गेल्या वर्षी गोव्यात राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या पर्पल महोत्सवाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केले होते. एवढेच नव्हे तर 2025 मध्ये हा महोत्सव गुजरात राज्यात आयोजित करण्याची इच्छाही मोदी यांनी व्यक्त केली होती.

पर्पल महोत्सवात चर्चासत्रे, कार्यशाळा, प्रदर्शने, क्रीडा स्पर्धा, विविध कलांचे सादरीकरण आदींवर भर देण्यात येत असतो. त्याद्वारे दिव्यांगजनांना एक सक्षम असे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. मैत्री व प्रेमभावना याला प्रोत्साहन देतानाच ज्ञान व माहितीचे आदानप्रदान करणे आणि दिव्यांगजनांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हा या महोत्सवाचा उद्देश असल्याचे खात्याने स्पष्ट केले आहे.