जलतरण तलावात बुडून ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

0
11

कांदोळी येथे एका रिसॉर्टमधील जलतरण तलावात बुडून एका ६ वर्षीय मुलाचा काल दुपारी मृत्यू झाला. रेवाज जैन या मुलाचे नाव असून, तो मुंबई येथील रहिवासी होता. ही घटना काल दुपारी १ वाच्या दरम्यान घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रेवाज जैन हा काही दिवसांपूर्वी आपल्या कुटुंबासोबत गोव्यात पर्यटनासाठी आला होता. सध्या त्याच्या कुटुंबाचे वास्तव्य कांदोळी येथील एका रिसॉर्टमध्ये होते, त्यावेळी ही घटना घडली.