जम्मू काश्मीरमधील चकमकीत लष्कराचे तीन अधिकारी शहीद

0
4

>> चकमकीत दोन अतिरेक्यांचा खात्मा

दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात काल बुधवारी सकाळी झालेल्या दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत जम्मू-काश्मीर पोलीस दलातील एक कर्नल, एक मेजर आणि एक पोलीस उपअधीक्षक शहीद झाले आहेत. 19 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष डोनचक आणि पोलीस उपअधीक्षक हिमायून मुझमिल भट अशी मृत अधिकाऱ्यांची नावे आहेत.

अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनागच्या जंगलात दहशतवाद्यांबद्दल माहिती मिळाल्यानंतर मंगळवारी सायंकाळी जम्मू – काश्मीर पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने कारवाई सुरू केली. बुधवारी सकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील शोधमोहिमेत ही चकमक उडाली. दरम्यान, राजौरी जिल्ह्यात सुरू असलेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. राजौरीमध्ये सुरू असलेल्या चकमकीत लष्कराच्या एका श्वानाचाही मृत्यू झाला आहे. त्याने स्वत:चा जीव धोक्यात घालून आपल्या हँडलरचा जीव वाचवला. या चकमकीत शहीद झालेल्या लष्कराच्या श्वानाचे नाव केंट असल्याचे लष्करी अधिकाऱ्याने सांगितले. चकमकीदरम्यान त्याने आपल्या हँडलरला वाचवले आणि तो शहीद झाला. पळून जाणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी ते सैनिकांच्या तुकडीचे नेतृत्व करत असताना हा अपघात झाला. यावेळी त्यांच्यावर जोरदार गोळीबार झाला होता. खराब हवामान असतानाही लष्कराने शोध सुरू ठेवला होता. सुरक्षा दलांनी राजौरी शहरापासून 75 किमी अंतरावर असलेल्या भागाला रात्रभर वेढा घातला आणि सकाळी आसपासच्या भागात शोध तीव्र केला.

आतापर्यंत 26 दहशतवादी ठार
सुरक्षा दलांना या परिसरात 3-4 दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर तेथे शोधमोहीम राबवण्यात आली. छाप्यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला, त्यानंतर चकमक सुरू झाली. या वर्षात आतापर्यंत सुरक्षा दलांनी राजौरी-पुंछ जिल्ह्यात 26 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. 10 सुरक्षा जवानही शहीद झाले आहेत. दोन संशयित पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. 11 सप्टेंबरच्या संध्याकाळी पत्राडा येथील जंगल परिसरात शोध आणि घेराबंदी मोहीम सुरू करण्यात आली. दोन व्यक्तींच्या संशयास्पद हालचाली पाहता काही गोळीबार करण्यात आला. मात्र, दोन्ही संशयित पळून गेले.