जपानच्या माजी पंतप्रधानांची हत्या

0
15

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे (६७) यांचे काल प्राणघातक हल्ल्यामध्ये निधन झाले. शुक्रवारी सकाळी शिंजो आबे निवडणुकीच्या प्रचाराचे भाषण करत असताना गर्दीतून एकाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. ते तिथेच स्टेजवर कोसळले. त्यानंतर आबे यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. आबे यांच्या निधनामुळे भारतात शनिवारी राष्ट्रीय दुखवटा पाळला जाणार आहे.