बाह्य विकास आराखड्यांच्या (ओडीपी) छाननीमध्ये अनेक गैरप्रकार निदर्शनास आले आहेत, अशी माहिती नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी काल दिली.
नगरनियोजन खात्याने राज्यातील तीन ओडीपी निलंबित करून त्यांच्या छाननीचे काम सुरू केले आहे. अनेक भाडेकरू आणि खाजन जमिनींचे रुपांतर करण्यात आले आहे. मुख्य नगर नियोजकांच्या अध्यक्षतेखालील खास समितीद्वारे सुरू असलेल्या ओडीपींच्या छाननीत अनेक गैरप्रकार अधोरेखित झाले आहेत. कळंगुट-कांदोळी ओडीपीची नव्याने तयार केलेल्या ओडीपीतील अनियमितता धक्कादायक स्वरूपाच्या आहेत, असे राणे यांनी नमूद केले.
छाननी समितीने पुनरावलोकन पूर्ण केल्यावर सर्वेक्षण क्रमांकानुसार सर्व माहिती जाहीर केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.