‘ग्रीन टुरिस्ट हॉटस्पॉट’ बनण्यास गोवा प्रयत्नशील

0
13

गोवा राज्य जागतिक नकाशातील पहिले ‘ग्रीन टुरिस्ट हॉटस्पॉट’ बनण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भारत हवामान आणि विकास भागीदारांच्या बैठकीत बोलताना येथे काल केले.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या उपस्थितीत भारतातील सर्वांत मोठे अक्षय ऊर्जा वित्तपुरवठादार पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन यांनी गोवा राज्याच्या हवामान महत्त्वाकांक्षेला समर्थन देण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. यावेळी पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा आणि इतरांची उपस्थिती होती.