गोव्याला सॉफ्टवेअर डेस्टिनेश म्हणून पुढे आणणार : रोहन खंवटे

0
21

सूर्य, वाळू व समुद्रकिनारे याच्याबरोबरच आता गोव्याची ओळख ही सॉफ्टवेअरसाठीचे राज्य अशीही असेल, असा विश्‍वास पर्यटन तथा माहिती-तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांनी काल व्यक्त केला. सुंदर किनारपट्टी लाभलेले आपले चिमुकले गोवा राज्य हे यापुढे सॉफ्टवेअरसाठीचे डेस्टिनेशन म्हणूनही पुढे येणार आहे, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

मुंबई येथे आयोजित केलल्या पहिल्या इनक्रेडिबल इंडिया इंटरनॅशनल क्रूझ कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते. या घडीला प्रत्येक राज्य हे अर्थव्यवस्थेविषयीचे आव्हान आणि जनतेला रोजगार प्राप्त करून देण्यासाठी काय करता येईल, या समस्येशी लढा देत आहे. १५ लाख एवढी लोकसंख्या असलेल्या गोव्यात दरवर्षी ८० लाख एवढे पर्यटक येत असल्याचे खंवटे यांनी नमूद केले.

पर्यटकांची संख्याही आता वाढू लागली आहे. २०१७-२० या काळात १.४९ लाख एवढे पर्यटक प्रवासी बोटीतून राज्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. प्रवाशी