लाईफ लाईन उडान विमानाद्वारे गोव्याला केंद्राकडून ७१४ किलो एवढा औषध पुरवठा करण्यात आला. गोव्याला औषधांचा साठा घेऊन आलेले लाईफ लाईनचे हे दुसरे विमान आहे. या विमानाद्वारे गोव्याला औषधांच्या ५० खोक्यांतून ७१४ किलो वजनाची औषधे पाठवली. कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर गोव्याला हा औषधांचा पुरवठा केलेला आहे. दरम्यान, कोरोनामुळे देशात लॉकडाऊन वाढवण्यात आल्यामुळे गोव्याच्या विमानतळावरून आत्तापर्यंत ६४१६ विदेशी पर्यटकांना त्यांच्या देशांत परत पाठवण्यात आले आहे.