गोव्यात 2027 मध्ये महिला आरक्षण लागू होईल ः तानावडे

0
29

देशपातळीवर महिलांसाठी 33 टक्के आरक्षण जाहीर झाले असून सर्व प्रक्रिया रीतसर पूर्ण झाली तर आगामी 2027च्या गोवा विधानसभा निवडणुकीत राज्यात किमान तेरा महिला आमदार होतील अशी प्रतिक्रिया राज्यसभा खासदार सदानंद तानावडे यांनी व्यक्त केली. तानावडे हे डिचोलीत सार्वजनिक गणेश मूर्तीच्या दर्शनास आले होते. त्यावेळी महिला आरक्षणाबाबत विचारले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.


गोव्यात सुशिक्षित तसेच राजकारण जाणाऱ्या सक्षम महिला आहेत. त्यामुळे निश्चितपणे चांगल्या सक्षम महिला उमेदवार लाभतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीनंतर या कायद्यासंदर्भातील विविध प्रक्रिया सुरू होऊन जनगणना मतदारसंघाचे समीक्षण होणार आहे. त्यानंतर गोव्याची विधानसभा निवडणूक होणार आहे. 2029च्या लोकसभा निवडणुकीत मात्र निश्चितपणे 33 टक्के आरक्षण निश्चित असल्याचे तानावडे यांनी सांगितले. यावेळी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार प्रेमेंद्र शेट व इतर उपस्थित होते.