गँगस्टर अतिकचा मुलगा असदचे झाशीत एन्काउंटर

0
9

उमेश पाल हत्याकांड प्रकरणातील फरार असलेला गँगस्टर अतीकचा मुलगा असद आणि शूटर गुलाम मोहम्मद या दोघांना उत्तर प्रदेश पोलिसांनी काल ठार केले. झाशीतल्या बडागाव येथील परीछा धरणाजवळ एसटीएफने असद आणि गुलामचा एन्काउंटर केला. दोघांवरही प्रत्येकी पाच-पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांकडे परदेशी शस्त्रे सापडली आहेत.

या दोघांनी 24 फेब्रुवारी रोजी उमेश पाल यांची हत्या केली आणि दोघेही फरार झाले होते. एसटीएफचे विशेष पथक सातत्याने या दोन आरोपींचा शोध घेत होते. ते दोघे झाशी येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना घेरत ठार केले. ‘आमच्या पथकाने असद आणि मकसूदला ठार केले आहे. त्यांच्याकडून पिस्तूल, रिव्हॉल्व्हर आणि परदेशी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत,’ असे एसटीएफचे उपमहानिरीक्षक अनंत देव तिवारी यांनी सांगितले.