क्रिकेट सट्टेबाजीप्रकरणी 12 जणांना अटक

0
4

>> पर्वरीतील हॉटेलवर पोलिसांचा छापा; 2 लाखांचा मुद्देमाल जप्त

पर्वरी पोलिसांनी येथील एका हॉटेलवर छापा टाकून क्रिकेट सट्टेबाजीचे रॅकेट चालवणाऱ्या 12 जणांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे दोन लाखांचा ऐवज जप्त केला.

पर्वरी पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, पर्वरी येथील एका हॉटेलमध्ये काही सट्टेबाज न्यूझीलंड विरुद्ध युएई यांच्या दरम्यान चालू असलेल्या टी-20 क्रिकेट सामन्यासाठा सट्टा घेत असल्याची माहिती गुरुवारी रात्री पोलिसांना विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. त्यानंतर पोलिसांनी एक तपास पथक तयार केले आणि सदर हॉटेलवर छापा टाकला, त्यावेळी 12 सट्टेबाज त्यांच्या हाती लागले. त्यांच्याकडून 10 मोबाईल संच, वायफाय राउटर, लॅपटॉप इत्यादी साहित्य मिळून सुमारे दोन लाखांचा ऐवज जप्त केला.

अटक केलेल्या संशयितांमध्ये संजय सुब्बा (रा. नवी दिल्ली), करण राजेश पाटील (रा. महाराष्ट्र), नवीन बात्रा (रा. छत्तीसगड), वरिंदर सिंग (छत्तीसगड), अमित मोरे (रा. महाराष्ट्र), अंकित कुमार (रा. झारखंड), आशिष मंत्री (रा. राजस्थान), रितेश जयस्वाल (रा. दिल्ली), सूरज नागदेव, किशन पोपटानी, तीलेश कुमार कुर्रे, श्रेय शर्मा (सर्व रा. छत्तीसगड) यांचा समावेश आहे. त्यांयाविरुद्ध गोवा,दमण आणि दीव सार्वजनिक जुगार प्रतिबंध कायदा 1976 नुसार 3 व 4 कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक सचिन यादव, उपनिरीक्षक प्रतीक भट प्रभू, हवालदार योगेश शिंदे, महादेव नाईक, उत्कर्ष देसाई आणि नितेश गावडे यांनी या छापा मोहिमेत भाग घेतला.