क्रिकेट सट्टेबाजीप्रकरणी चौघा जणांना अटक

0
9

क्रिकेटवर सट्टेबाजी करणाऱ्या चौघा जणांना गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी मंगळवारी हणजूण येथे पकडले. पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या पाकिस्तान सुपर लिगच्या क्रिकेट सामन्यांसाठी ही सट्टेबाजी चालू होती. गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी हणजूण येथील एका बंगल्यावर छापा टाक चार जणांना अटक केली. त्यांच्याकडून 2 लाख रुपये किमतीचे मोबाइल हँडसेट जप्त करण्यात आले आहे. या संशयितांनी 3 लाख रुपयांचा सट्टा स्वीकारला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे सुरिंदर कार्ला, रजत कार्ला, कशिश कार्ला व हितेश कार्ला अशी आहेत.