24.8 C
Panjim
Thursday, January 21, 2021

‘कोविशिल्ड’चा पहिला साठा गोव्यात दाखल

>> मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती, २३,५०० डोस प्राप्त

गोव्याला पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने बनविलेल्या कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लशीच्या २३,५०० डोसांचा पहिला साठा मिळाला असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.

केंद्र सरकारकडून गोव्याला प्रत्येकी १० डोस असलेल्या २३५० कुपी प्राप्त झाल्या आहेत. कोविशिल्ड लशीचे डोस सुरक्षित वातावरणात ठेवण्यात आले असून लसीकरणाच्या २४ तास अगोदर कोरोना लशीचे डोस आठही केंद्रावर उपलब्ध केले जाणार आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत सांगितले.
देशभरात येत्या १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात केली जाणार आहे. केंद्र सरकारने आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिलेल्या कोविशिल्ड या लशीच्या डोसांचे वितरण केले जात आहे. पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियातर्फे तयार करण्यात आलेल्या कोविशिल्ड लशीचे डोस मोठ्या दोन बॉक्समधून दाबोळी विमानतळावर आणून आरोग्य खात्याच्या स्वाधीन करण्यात आले आहेत.
गोवा सरकारने कोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण केली आहे. कोरोना लसीकरणासाठी आठ इस्पितळे निश्‍चित केली आहेत. त्यात पाच सरकारी आणि तीन खासगी इस्पितळांचा समावेश आहे.

आरोग्य कर्मचार्‍यांना
पहिली लस देणार

कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात सरकारी आणि खासगी इस्पितळात आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोना लस दिली जाणार आहे. कोविड पोर्टलमध्ये नोंदणी केलेल्यांना आरोग्य कर्मचार्‍यांना लसीसाठी संदेश पाठविले जाणार आहेत. केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे लसीकरण केले जाणार आहे. राज्याला सुमारे २३,५०० लशी प्राप्त झालेल्या आहेत. कोरोनाची पहिली लस दिल्यानंतर २८ दिवसांनी दुसरी लस दिली जाणार आहे. त्यामुळे लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात दहा ते साडेदहा हजार जणांना लस दिली जाऊ शकते. २८ दिवसानंतर पुन्हा दुसरा डोस देण्यासाठी लस राखीव ठेवली जाणार आहे. आरोग्य कर्मचार्‍यांना लस दिल्यानंतर फ्रंटलाईन आरोग्य कामगार, ५० वर्षावरील आणि ५० वर्षात खालील लोकांना लस दिली जाणार आहे, अशी माहिती आरोग्य खात्याच्या सूत्रांनी दिली.

कोरोना बळींनी गाठला साडेसातशेचा टप्पा
राज्यात चोवीस तासात एका कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोना बळींच्या संख्येने ७५० चा टप्पा गाठला आहे. नवीन ९६ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येने ५२ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५२,०७९ एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या ८१४ एवढी आहे.
गोमेकॉमध्ये वास्को येथील ५० वर्षीय महिला रुग्णाचे निधन झाले आहे. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ७५० एवढी झाली आहे.
आणखी ७८ कोरोना रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५०,५१५ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के एवढे आहे.
कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या नवीन ६८ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. इस्पितळात नवीन १९ रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत.
चोवीस तासात १९४२ स्वॅबच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली असून ४.९४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
मडगाव आरोग्य केंद्राच्या क्षेत्रातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ९४ एवढी आहे. पणजी आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात ५९ रुग्ण, फोंडा आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात ५५ रुग्ण आहेत. राज्यातील इतर भागातील आरोग्य केंद्रातील कोरोना रुग्णांची संख्या पन्नासपेक्षा कमी आहे.

देशभरात लस पाठवली
पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूट आणि हैदराबादमधील भारत बायोटेक यांनी आपली अनुक्रमे कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लशीच्या पहिल्या टप्प्यासाठी देशातील विविध शहरांमध्ये लस पाठवण्यात आली. भारत बायोटेकने दोन डोसची कोव्हॅक्सिन लस बुधवारी देशभरातील ११ शहरांमध्ये पाठवली.
भारत बायोटेककडून कोव्हॅक्सिन लसीची पहिली बॅच मध्यरात्री १ वाजता विविध शहरांसाठी रवाना झाली.
सीरमच्या ‘कोविशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लसींना भारत सरकारने आपत्कालिन वापरासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे शनिवारपासून सुरू होणार्‍या सरकारच्या सार्वजनिक लसीकरणात या दोन लशींचा वापर केला जाणार आहे.
याबाबत माहिती देताना भारत बायोटेकने, गनवरम, गुवाहाटी, पटना, दिल्ली, कुरुक्षेत्र, बंगळुरु, पुणे, भुवनेश्वर, जयपूर, चेन्नई आणि लखनऊ या शहरांसाठी बुधवारी पहाटे लसीची पहिली बॅच यशस्वीरित्या पाठवून दिल्याची माहिती दिली.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

ध्यासपंथी

देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती…वाळवंटातुनी सुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती --बा. भ. बोरकर जीवनभर एखादा ध्यास घेऊन वावरणार्‍या व्यक्ती...

ऐतिहासिक मालिका विजय

कसोटी क्रिकेटमधील वैयक्तिक नीचांकी धावसंख्या ते ऐतिहासिक मालिका विजय असे परस्परविरोधी क्षण टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया दौर्‍यात अनुभवायला मिळाले. राखेतून फिनिक्स पक्षी ज्याप्रमाणे...

तीन-चार दिवसांत मिळेल डिस्चार्ज

>> श्रीपाद नाईक यांनी दिली माहिती देवाची कृपा आणि सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. येत्या चार-पाच दिवसात...

केंद्रीय सचिवालय उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन ः मुख्यमंत्री

केंद्र सरकारची राज्यातील सर्व कार्यालये एका छताखाली आणण्यासाठी केंद्रीय सचिवालय उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल...

स्वातंत्र्यसैनिक व ‘मार्ग’चे प्रणेते गुरुनाथ केळेकर यांचे निधन

ज्येष्ठ गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक, कोकणी चळवळीतील एक नेते व ‘मार्ग’ ह्या रस्ता सुरक्षाविषयक चळवळीचे संस्थापक श्री. गुरुनाथ केळेकर (९१) यांचे काल पहाटे ३.३०...

ALSO IN THIS SECTION