कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या ५००च्या खाली

0
10

राज्यातील कोरोना सक्रिय रूग्णसंख्या पाचशेच्या खाली आली असून ती ४८० एवढी झाली आहे. चोवीस तासांत नवीन ७२ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. चोवीस तासांत ८४४ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. राज्यातील कोरोनाबाधित आढळून येण्याचे प्रमाण ८.५ टक्के एवढे आहे. चोवीस तासांत एकाही नवीन बाधिताला इस्पितळात दाखल करण्यात आलेले नाही. कोरोना बळींची एकूण संख्या ३९६५ एवढी आहे. चोवीस तासांत आणखी १११ बाधित बरे झाले आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.२७ टक्के एवढे आहे.