कोरोना : ‘दाबोळी’वर प्रवाशांची तपासणी नाही : विजय सरदेसाई

0
112

गोवा सरकार कोणतीही गोष्ट गंभीरपणे घेत नसून कोरोना विषाणूंच्या फैलावाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात सरकारी शिगमोत्सवाचे आयोजन करावे की नाही याचा सरकारने निर्णय घ्यायला हवा. गर्दीचे कार्यक्रम आयोजित करू नका अशी केंद्र सरकारने जी सूचना केलेली आहे ती आपणाला मान्य आहे की नाही याचा विचार करून पुढे काय करायचे याचा निर्णय सरकारने घ्यावा, असे गोवा फॉरवर्ड पार्टीचे आमदार व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई या काल त्यांना या संदर्भात विचारले असता सांगितले. गोवा सरकारची या प्रश्‍नावर स्पष्टता असायला हवी. मात्र, सध्या तरी ती दिसत नसल्याचे सरदेसाई म्हणाले. कोरोनाबाबत दाबोळी विमानतळावर प्रवाशांची कोणतीही तपासणी होत नसल्याने गोवा सरकार याप्रश्‍नी गंभीर नाही असा दावा त्यांनी केला.

कोरोना विषाणूंच्या फैलावाचा धोका लक्षात घेऊन जर गोवा सरकारने सरकारी शिगमोत्सव रद्द केला तर राज्यातील जी जी कलापथके या शिगमोत्सवात सहभागी होणार होती त्या सर्वांना होणार असलेल्या नुकसानीची भरपाई सरकारने त्यांना द्यावी, अशी सूचनाही सरदेसाई यानी केली.