बांबोळी येथील गोमेकॉ हॉस्पिटलच्या कोरोना वॉर्डात कोरोना संशयित आणखी ४ रुग्णांना काल दाखल करण्यात आले असून तेथे १० संशयितांवर उपचार सुरू आहेत.
आरोग्य खात्याने आणखी ५६ जणांना घरी निगराणीखाली ठेवले असून घरी निगराणीखालील नागरिकांची संख्या १४२८ एवढी झाली आहे.
गोमेकॉच्या कोरोना वॉर्डातून १० नमुने तपासणीसाठी कोविड प्रयोगशाळेत पाठविले आहेत. प्रयोगशाळेतून अहवाल जाहीर करण्यात आले असून सर्व २३ अहवाल नकारात्मक आहेत. आणखी ११ अहवालांची प्रतीक्षा आहे. मडगाव येथील कोविड १९ हॉस्पिटलमध्ये ६ जणांवर उपचार सुरू आहेत. तसेच ९ जणांना सरकारी निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.