26 C
Panjim
Monday, January 18, 2021

कोरोनाने विश्‍वच बदलले!

  • श्रीशा वागळे (जीवनशैलीच्या अभ्यासक)

रेस्टॉरंट्‌स, कॅङ्गेज्‌मधली मेनूकार्डस्, रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारी पेये, खाद्यपदार्थांनी सजली आहेत. लग्नं अगदी कमी खर्चात उरकली जात आहेत. गर्दी टाळण्यावर लोकांचा भर आहे. कोरोनाकाळाने आपल्या माणसांचे महत्त्व पटवून दिले आहे. या दिवसांत आपल्या बिनधास्त, बेलगाम जीवनाला शिस्त लागली आहे हे मात्र खरे!

कॅफेजसारखी ठिकाणं म्हणजे तरुणाईचा अड्डा. अशा कॅङ्गेजमध्ये निवांत बसायचं. कॉफी ऑर्डर करायची. कॉङ्गीचे घोट घेत मित्रमैत्रिणी किंवा कुटुंबीयांसोबत मस्त गप्पा मारायच्या आणि छान रिलॅक्स व्हायचं… कोरोनाच्या आधी शहरांमधल्या नामांकित कॅङ्गेज्‌मध्ये हे दृश्य नेहमी दिसायचं. अशा कॅङ्गेमध्ये जाऊन कोणी हळद आणि मध घातलेली कॉङ्गी प्यायचा विचारही करत नव्हता. खरं तर अशी कॉङ्गी बनतही नव्हती. पण आता परिस्थिती बदलली आहे. आता या कॅङ्गेज्‌च्या मेनूकार्डवर नजर टाकली तर इम्युनिटी बूस्टिंग म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढवणार्‍या पेयांची नावं तुम्हाला दिसतील! कोरोनाकाळाने प्रत्येकालाच आरोग्यदायी जीवनशैली आणि त्यातही रोगप्रतिकारशक्तीचं महत्त्व पटवून दिलं आहे. त्यामुळे जंक ङ्गूड खाणारी तरुणाई आणि इतर मंडळी सध्या हेल्दी ङ्गूडची निवड करत आहेत. याच कारणामुळे विविध ब्रँड्‌सनी आरोग्यदायी उत्पादनं बाजारात उतरवायला सुरुवात केली आहे. यामुळे शर्करायुक्त, आरोग्याला हानीकारक अशा कार्बनयुक्त पेयांऐवजी हळद, आलं, तुळस, मधयुक्त दुधाला पसंती मिळू लागली आहे.

एव्हाना दूध उत्पादक कंपन्यांनी सादर केलेल्या या उत्पादनांना चांगला प्रतिसाद मिळाला. कोरोनाच्या प्रसाराला सुरुवात होत असताना, म्हणजेच मार्च महिन्यात च्यवनप्राश, हळद आणि मध यांच्या मागणीत मोठी वाढ नोंदवण्यात आली. च्यवनप्राशची मागणी दोन टक्क्यांवरून ८१ टक्क्यांवर, तर मधाची मागणी १० टक्क्यांवरून ३५ टक्क्यांवर पोहोचली. हळदीच्या मागणीतही सात टक्क्यांवरून ३८ टक्के इतकी वाढ झाली. औषधी गुणधर्म असलेल्या उत्पादनांना असणारी वाढती मागणी पाहून तुळस, मध, च्यवनप्राश, हळदीच्या चवीची आईस्क्रीम्सही बाजारात आली. निरोगी आयुष्य हीच खरी संपत्ती असते हे ठसवण्याचे काम या आजाराने केले हे मात्र खरे! आता लोकांमध्ये आरोग्याबाबत प्रचंड जागरूकता निर्माण झाली आहे, ही सकारात्मक बाब म्हणायला हवी.
कोरोनाने लग्न करण्याच्या पद्धतीतही आमूलाग्र बदल घडवला. टाळेबंदीच्या काळात अनेकांनी लग्ने उरकून घेतली. या लग्नांमध्ये ङ्गारसा डामडौल नव्हता. दोन्ही बाजूंच्या मिळून ङ्गक्त २० माणसांच्या उपस्थितीत हे लग्नसोहळे पार पडले. भारतात लग्नांवर प्रचंड पैसा खर्च होतो. आमंत्रितांची भली मोठी यादी तोंडाला ङ्गेस आणते. प्रत्येकजण आपल्या ऐपतीनुसार लग्नाचा बार उडवून देतो. मुख्य लग्नसोहळ्यासह हळदी, मेहंदी, संगीत आणि स्वागत समारंभ अशा कार्यक्रमांची रेलचेल असते. मुलामुलींचं लग्न धूमधडाक्यात करण्यासाठी आईबाप सज्ज असतात. प्रसंगी कर्जही काढलं जातं. या सगळ्यात वधूपित्याला आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागतं. कोरोनामुळे मात्र या सगळ्या खर्चाला कात्री लागली असून लाखो रुपयांचा खर्च आता हजारांच्या घरात आला आहे. काही माणसांच्या उपस्थितीत, साधेपणाने लग्नसोहळा संपन्न होऊ शकतो याची जाणीव लोकांना होऊ लागली आहे. लग्नाचा खर्च टाळून हाच पैसा वधूवरांच्या भविष्यासाठी, आरोग्यासाठी साठवून ठेवायला हवा, ही भावनाही रूजू लागली आहे. कोरोनाकाळाने हा धडाच आपल्याला घालून दिलाय.

सरकारने सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांमधल्या उपस्थितीच्या आकड्यात वाढ केली असली तरी ङ्गार पाहुण्यांना बोलावण्याची, उगाचच गर्दी करण्याची लोकांची मानसिक तयारी झालेली नाही. त्यामुळे लग्नांचा खर्च आटोक्यातच राहणार आहे. लाखो रुपयांची लग्नं अवघ्या ५० हजार रुपयांमध्ये उरकण्यात येत आहेत. अर्थात कोरोना असला तरी कार्यालयं, बॅक्वेट्‌स तसेच हॉटेल्सनी यातूनही व्यवसायाचा अनोखा मार्ग शोधून काढला. त्यांनी ५० हजार रुपयांची पॅकेजेस आणली. लग्न पन्नास हजारांमध्ये उरकायचं असलं तरी घरबसल्या का होईना, शक्य तितकी मजा केली जात आहे. खरं तर ५० हजारात लग्न करण्याची टूमच निघाली आहे. या कमी खर्चातल्या लग्नात मजा-मस्तीची, करमणुकीची अजिबात कमतरता नाही. ५० हजारांच्या पॅकेजमध्ये हॉलची सजावट, गुरुजी, जेवणासोबत ढोलताशेही उपलब्ध करून दिले जात आहेत. यामुळे थोडं गाणं-बजावणंही होऊन जातं. या छोट्या पॅकेजमध्ये वेलकम ड्रिंक आणि स्टार्टर्सचाही समावेश आहे. खर्‍या अर्थाने हे अत्यंत परिपूर्ण पॅकेज ठरलं आहे.

कोरोनाकाळात लग्नांमध्ये दोन्ही पक्षांकडून एकूण ५० पाहुण्यांच्या सहभागाला परवानगी असल्यामुळे मुलीकडचे २५ आणि मुलाकडचे २५ अशी विभागणी केली जाते. मग इतर नातेवाईकांचं, पै-पाहुण्यांचं काय…? तर त्यावरही उपाय शोधण्यात आला. सध्या मिटिंग्ज, गेट टूगेदर सगळं काही ऑनलाईन किंवा व्हर्च्युअली सुरू आहे. ‘झूम’, ‘गूगल मिट’सारखी ऍप्स त्यासाठीच तयार करण्यात आली आहेत. इतर मंडळी ‘झूम’ किंवा अन्य ऍप्सच्या माध्यमातून लग्नसोहळा अनुभवतात. आपापल्या घरातूनच वधुवरांना आशीर्वाद देतात. यासाठी हॉटेल किंवा बँक्वेट्‌सतर्ङ्गे कॉम्प्युटर, लॅपटॉप उपलब्ध करून दिले जातात. लग्नाला प्रत्यक्ष उपस्थित राहता आलं नाही तरी व्हर्च्युअली सगळं काही एन्जॉय करता येतं. संगीत सोहळ्यासाठी व्हर्च्युअली नृत्य शिकवलं जातं. लग्नादरम्यान स्क्रीनवर हे नृत्य दाखवलं जातं. व्हर्च्युअल स्क्रीनिंगच्या माध्यमातून संगीत सोहळा पार पडतो. लग्नात वधुवरांसह ङ्गोटो काढले जातात. पण व्हर्च्युअली सोहळा अनुभवणार्‍यांनी काय करायचं? सध्याच्या तांत्रिक युगात काहीच अशक्य नाही. कार्यस्थळी सेल्ङ्गी पॉईंट्‌स तयार केले जातात. झूमसारख्या ऍपमध्ये ङ्गोटो काढण्याची सोय आहे. या सेल्ङ्गी पॉईंट्‌सवर कॉम्प्युटरवरून सोहळा पाहणार्‍या व्हर्च्युअल पाहुण्यांचे ङ्गोटो काढले जातात. हे ङ्गोटो त्यांना मेल केले जातात. लग्नामध्ये सुरक्षेच्या उपाययोजनांची पूर्ण काळजी घेतली जाते. सजावटीच्या वस्तूंपासून पाहुण्यांचे हात सॅनिटाईज केले जातात. खाद्यपदार्थ बनवतानाही पूर्ण खबरदारी घेतली जाते. पाहुण्यांच्या शरीराचं तापमान तपासूनच त्यांना मंडपात प्रवेश दिला जातो.

९९, ४९९, ९९९ रुपयांना वस्तू मिळतात. त्याचप्रमाणे आता ४९,९९९ रुपयांमध्ये लग्नाचं पॅकेज तयार करण्यात आलं आहे. लग्नासाठी १५ ते २० लाख रुपयाचं बजेट असणार्‍यांनी या स्मॉल बजेटमधल्या लग्नाला प्राधान्य दिले आहे. खरे तर लग्नांमधला डामडौल काही काळच आनंद देतो. त्यानंतर नवविवाहित दांपत्याला संसार सुरू करायचा असतो. लग्नसोहळ्यांवर पाण्यासारखा पैसा खर्च करण्यापेक्षा याच पैशांमध्ये वधुवरांचं भविष्य सुरक्षित करता येऊ शकतं. लग्न कमी खर्चात आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करणं ही संकल्पना अलीकडच्या काळात कालबाह्य झाली होती. लग्न म्हणजे भरपूर खर्च हे समीकरण दृढ झालं होतं. मात्र कोरोनामुळे लग्न कमी खर्चात उरकता येतं हे आपल्याला कळून चुकलं आहे. म्हणूनच कोरोनाकाळानंतर ५० हजारांच्या लग्नांचा ट्रेंड रूजला तर आश्‍चर्य वाटायला नको. कोरोनामुळे आज प्रत्येकजण स्वत:ला जपत आहे. वारंवार हात धुणं, मास्क घालणं, गर्दी टाळणं, लोकांपासून लांब राहणं हे सगळं आता आयुष्याचा अविभाज्य भाग बनून गेलं आहे. या गोष्टी अंगवळणी पडत आहेत. स्वत:सोबतच आप्तांचीही काळजी घेतली जात आहे.

छोट्या आणि मोठ्या पडद्यावरचे सेलिब्रिटीही लोकांना मदत करत आहेत. अभिनेता सोनू सूदने कामगारांना स्वखर्चाने स्वगृही पोहोचवलं. गरजूंना आर्थिक मदत दिली. लोकांचा त्रास कमी करण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न केले. अमिताभ बच्चन यांनीही काही त्रस्त स्थलांतरितांसाठी विमान आरक्षित केलं. शाहीद कपूरने सोबत काम करणार्‍या ४० डान्सर्सना मदत केली आहे. तिकडे विनोदवीर भारती सिंह सेटवरील कर्मचार्‍यांच्या सुरक्षेबाबतही सजग आहे. म्हणूनच तिने तिच्या टीमच्या सदस्यांसाठी पीपीई किटची व्यवस्था केली. ती म्हणते, आमच्या टीममधले सदस्य, कर्मचारी आम्हा कलाकारांवर अवलंबून असतात. देवाच्या कृपेने आमच्याकडे पैसे आहेत. मात्र हातावर पोट असणार्‍यांचं, तुटपुंज्या पगारात काम करणार्‍यांचं काय? मी माझ्या कर्मचार्‍यांना काम करत नसतानाही पगार देत होते. आजही शक्य ती मदत करत आहे. स्वत:प्रमाणे त्यांचीही काळजी घेण्याचा माझा प्रयत्न आहे. कोरोनासारख्या आपत्तीच्या काळात मित्र, नातेवाईकच नाही तर सोबत काम करणार्‍या कर्मचार्‍यांनाही मदतीचा हात देण्याचा हा प्रयत्न निश्‍चितच कौतुकास्पद आहे. कोरोनाने दु:ख तर दिलं पण या निमित्ताने संवेदनशीलताही वाढीस लागली. ही कोरोनोत्तर काळातल्या नव्या बदलाची नांदी आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.

कोरोनावर औषध किंवा लस नाही. म्हणूनच रोगप्रतिकारशक्तीच्या बळावरच या विषाणूवर मात करायची आहे. कोरोनाने जीवनशैलीत मोठा बदल घडवून आणला आहे. व्यायामाचे व्हर्च्युअल क्लास सुरू आहेत. रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारी योगासनं तसंच श्‍वसनप्रकार शिकवणार्‍या क्लासचं ऑनलाईन आयोजन केलं जात आहे. येत्या काळात जीम किंवा वॉकला जाण्याऐवजी ‘घरच्या घरी व्यायाम’ ही संकल्पना अस्तित्वात येऊ शकते. घरातच आपल्या सोयीच्या वेळेनुसार व्यायाम करणं सुखावह वाटू लागलं आहे. यानिमित्ताने अनेकांना अर्थार्जनाचा मार्गही गवसला आहे. कुकिंगपासून बागकामापर्यंत विविध कायर्र्शाळांचं ऑनलाईन आयोजन केलं जात आहे. ट्रेनिंग सेशन्स, सेमिनार्स, वर्कशॉप्स सगळं काही ऑनलाईन झालं आहे. सेमिनार्सचे आता वेबिनार्स झाले आहेत. ऑनलाईन खरेदीकडे लोकांचा कल वाढत आहे. कोरोनाच्या आधी वरचेवर न भेटणार्‍या नातेवाईकांनी व्हर्च्युअली का होईना, ङ्गॅमिली गेट टूगेदरचं आयोजन केलं. टाळेबंदी काळात लोकांना नातलग, मित्रमैत्रिणींना भेटता आलं नाही. त्यामुळे आपल्या माणसांचं महत्त्वही अधोरेखित झालं आहे. शरीराने लांब असणारी माणसं मनाने मात्र जवळ आल्याचं सुखावह चित्र दिसू लागलं. एकमेकांना गृहित धरण्याचं प्रमाण कमी झालं आहे. संवाद वाढला आहे.
रेस्टॉरंट्‌सचं मेनू कार्ड बदलत आहे. हळदीचा, ओवा घातलेला गवती चहा, काश्मिरी काव्हा, अँटी कोरोना चहा, हर्ब्ज अँड सीड ब्रेड, नाचणीचे टॅकोज असे खाद्यपदार्थ, पेयं उपलब्ध करून देण्यात आली आहेत. रेस्टॉरंट्‌समध्ये आता कोल्ड ल्ड्रिंक्सऐवजी आयुर्वेदिक काढे मिळू लागले आहेत. अगदी पंचतारांकित हॉटेल्सही मेनूमध्ये बदल करत आहेत. रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारी आरोग्यदायी खिचडी त्यांच्या मेनूचा भाग झाली आहे! काही हॉटेल्स ग्राहकांना अँटी कोरोना ज्यूस देत आहेत. मिठायांमध्येही वैविध्य बघायला मिळत आहे. रोगप्र्रतिकारक क्षमता वाढवणार्‍या मिठाया सादर होत आहेत. त्यात ‘इम्युनिटी संदेश’ हा प्रकार बराच लोकप्रिय झाला आहे. हा संदेश बनवण्यासाठी १५ औषधी वनस्पती आणि मसाल्यांचा वापर करण्यात आला आहे. कोरोनाने प्रत्येकाला धडा दिला आहे. निरोगी राहणं आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवणं किती गरजेचं आहे हे आता लोकांच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे येत्या काळात आरोग्यदायी जीवनशैली अंगिकारली जाईल. कोरोना जाईल, सगळं काही पुन्हा सुरळीत होईलही; मात्र कोरोनाने दिलेली निरोगी आयुष्याची ही गुरूकिल्ली आपण सांभाळून ठेवायला हवी. हा जिव्हाळा, आपलेपणा जपायला हवा. कोरोनाच्या आठवणी मागे टाकून हे देणं मात्र सदैव जपायला हवं.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

मागणी मान्य

अखेर मेळावलीवासीयांची मागणी मान्य झाली. त्यांनी स्थानिक आमदार विश्वजित राणे यांना नमवले. विश्वजितनी सरकारला नमवले आणि मेळावलीतून आयआयटी प्रकल्प अन्यत्र हलविण्यास सरकार...

मेळावलीतील आयआयटी प्रकल्पाचे

>> मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेत माहिती, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार शेळ-मेळावली येथील आयआयटी प्रकल्पाला स्थानिक लोकांचा असलेला तीव्र विरोध लक्षात...

आजपासून देशात कोरोना लसीकरण

>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...

आजपासून देशात कोरोना लसीकरण

>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...

पंतप्रधानांनी फोनद्वारे केली श्रीपादभाऊंची विचारपूस

अंकोल्याजवळ अपघातात जखमी झालेले व सध्या गोमेकॉमध्ये उपचार घेणारे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून...

ALSO IN THIS SECTION

आर्थिक २०२० ः सिंहावलोकन

शशांक मोहन गुळगुळे एक महिन्यानंतर केंद्रीय अर्थमंत्र्यांना २०२१-२०२२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करावा लागणार. हा अर्थसंकल्प सादर...

उद्याचा काय नेम?

डॉ. सोमनाथ कोमरपंत माणसाने कसे वागावे याची संथा कवीने दिलेली आहे. तुला आज जे काय वाटतं ते तू...

स्वीकार

डॉ. फ्रान्सिस फर्नांडिस ‘‘दोन वर्षांपूर्वी आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध मी लग्न केलं. डॅनी हँडसम, प्रामाणिक व सरळ स्वभावाचा म्हणून मी...

भोबे, ‘मासे आणि मी’ आणि… मी!

सखाराम शेणवी बोरकर केवळ अठ्ठेचाळीस वर्षांच्या भोबे यांच्या आयुष्यातील शेवटची दहा वर्षे हा त्यांचा लेखनकाळ होता. या दहा...

‘डिजिटल पेमेन्टस्’चे पर्याय

शशांक मो. गुळगुळे १ जानेवारी २०२१ पासून ग्राहकांना काही बदलांना सामोरे जावे लागणार आहे. त्यापैकी एक बदल म्हणजे-...