केरळातील तरुणाचा पर्वरीतील अपघातात मृत्यू

0
1

येथील एका दुचाकीला अपघात होऊन केरळातील एका 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. अब्राहम मॅथ्यू थेली असे मृत तरुणाचे नाव आहे. दुचाकीवर मागे बसलेली काव्याश्री ही जखमी झाली. अब्राहम थेली हा तरुण आपल्या दुचाकीने (क्र. जीए-03-एल-7023) म्हापशाहून पणजीला जात असताना त्याने ट्राफिक सिग्नल तोडून आपले वाहन निष्काळजीपणे हाकले. त्यात त्याचा दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि तो मालवाहू गाडीच्या (क्र. केए-22-डी 0751) चाकाखाली सापडला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.