केजरीवालांच्या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाकडून लांबणीवर

0
8

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी 26 जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने अद्याप निर्णय दिलेला नाही, त्यामुळे त्यापूर्वी कोणताही आदेश देणे योग्य होणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
कनिष्ठ न्यायालयाने जामीन मंजूर करूनही अरविंद केजरीवाल तुरुंगात आहेत. कारण ईडीने दिल्ली उच्च न्यायालयात त्यांच्या जामिनाला विरोध करत स्थगितीची मागणी केली होती. 21 जून रोजी दिल्ली उच्च न्यायालयाच्या सुट्टीतील खंडपीठाने ईडीच्या याचिकेवर निकाल येईपर्यंत जामीनाला स्थगिती दिली होती.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने 24-25 जूनपर्यंत निकाल देऊ, असे सांगितले होते. तोपर्यंत जामिनावर स्थगिती राहणार आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात केजरीवाल सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते.
कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात ईडीने 21 जून रोजी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.