केंद्रीय वन सचिवांशी विविध प्रस्तावांवर चर्चा

0
19

वनमंत्री विश्‍वजीत राणे यांनी काल वन महासंचालक तथा भारत सरकारच्या वन, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाचे सचिव चंद्रप्रकाश गोयल यांची भेट घेऊन त्यांच्याशी राज्याच्या वन खात्यासंबंधीच्या विविध प्रस्तावासंबंधी चर्चा केली.

राज्यातील अभयारण्यात प्राण्यांचा अधिवास वाढवण्यासंबंधीची योजना, बोंडला प्राणी संग्रहालयाचा दर्जा वाढवणे, तसेच अभयारण्यात जंगल सफारींसाठी सोय निर्माण करणे आदींबाबत आपण चंद्रप्रकाश गोयल यांच्याशी चर्चा केल्याचे राणे यांनी काल दै. ‘नवप्रभा’शी बोलताना सांगितले. या बैठकीत वरील प्रस्तावांबाबत चंद्रप्रकाश गोयल यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. गोवा वन खात्याच्या प्रस्तावांसंबंधी आपण राज्याच्या विशेष मुख्य वनपालांशी चर्चा करणार आहे. गोव्याचा प्रस्ताव हा खूप चांगला असून, गोव्याच्या अभयारण्यात वन्य प्राण्याचंा अधिवास वाढवण्यासंबंधीची वन खात्याची योजना ही खूप चांगली असल्याचे गोयल यांनी नमूद केल्याचे राणे म्हणाले.