केंद्रातील भाजप सरकारने काल गुरूवारी केंद्रीय कायदा मंत्रीपदावर अर्जुन राम मेघवाल यांची नियुक्ती केली आहे. मागील काही दिवसांपासून न्यायव्यवस्था, सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे किरेन रिजिजू यांचे कायदा मंत्रिपद काढून घेण्यात आले होते. त्यांच्याजागी मेघवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवे कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांची 1982 मध्ये आयएएस अधिकारी म्हणून निवड झाली होती. यानंतर त्यांनी राजस्थानमध्ये आपली सेवा बजावली. काही कालावधीनंतर मेघवाल यांना जिल्हा दंडाधिकारी बनवण्यात आले. मेघवाल यांनी कायदा आणि मास्टर ऑफ बिझनेस डमिनिस्ट्रेशनचेदेखील शिक्षण घेतले आहे. मेघवाल 2009 साली राजस्थानच्या बिकानेरमधून निवडून आले. पाच वर्षानंतरही ते पुन्हा एकदा निवडून आले.