केंद्रिय वित्त आयोगाकडून राज्याला १७७ कोटी मंजूर

0
120

 

केंद्र सरकारच्या वित्त विभागाने केंद्रीय करातून राज्याला मिळणार्‍या अर्थसाहाय्याचा एक भाग म्हणून १७७.७१ कोटी रुपये मंजूर केले आहेत.

पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय वित्त मंत्रालयाने एप्रिल महिन्याचा वाटा म्हणून ही रक्कम मंजूर केली आहे. केंद्रीय कराच्या माध्यमातून राज्याला या वर्षी अंदाजे ३०२६ कोटी रुपये मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गतवर्षी सुमारे २४८० कोटी रुपये प्राप्त झाले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.