काश्मिरी पंडित शिक्षिकेची हत्या

0
22

>> कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी झाडल्या गोळ्या

जम्मू-काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. काल कुलगामच्या गोपालपुरा येथे दहशतवाद्यांनी एका काश्मिरी पंडित शिक्षिकेवर गोळ्या झाडल्या. या शिक्षिकेला लगेचच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिथे तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सुरक्षा दलाकडून संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला.

रजनी भल्ला असे मृत पावलेल्या शिक्षिकेचे नाव आहे. त्या दक्षिण काश्मीरमधील कुलगाम भागातील गोपालपुरा येथील एका सरकारी शाळेत स्थलांतरित शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.
काल सकाळी झालेल्या या हल्ल्यात रजनी भल्ला गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात नेल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. काश्मीर पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला असून, सर्व दहशतवाद्यांचा लवकरच शोध घेऊन त्यांचा खात्मा केला जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.