कार नदीत कोसळून महिलेसह मुलीचा मृत्यू

0
8

तारीपांटो-सांगे येथील पुलाजवळ काल रात्री उशिरा महिलेचा कारवरील ताबा सुटल्याने ती थेट नदीत कोसळली. त्यानंतर कुडचडे अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरू केले आणि कार नदीच्या पाण्यातून बाहेर काढली. या कारमध्ये कारचालक महिलेसह एक मुलगी होती, त्याचा दोघांचाही मृत्यू झाला. कारचा पत्रा कापून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.