कारची दुचाकीला धडक, वास्कोत महिलेचा मृत्यू

0
3

शांतीनगर वास्को राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव कारने एका दुचाकीला ठोकरल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. तर तिची दोन मुले गंभीर जखमी झाल्याची घटना काल रविवारी घडली. रविवारी संध्याकाळी 6 च्या दरम्यान एका भरधाव कारने शांतीनगर येथे एका दुचाकीला ठोकर दिली असता दुचाकीचालक महिला दुचाकीवरून उसळून महामार्गावर पार्क केलेल्या ट्रकवर पडली व गंभीर जखमी झाली. यावेळी तिच्याबरोबर दुचाकीवर तिची दोन मुले होती. तीही गंभीर जखमी झाली. त्यांना चिखली येथे नेले असता महिलेला मृत घोषित करण्यात आले. तर मुलांवर उपचार सुरू आहेत. वास्को पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.