काँग्रेस, भाजपकडून खासदारांना व्हिप जारी

0
32

भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसकडून पक्षातील खासदारांसाठी व्हिप जारी करण्यात आला आहे. संसदेच्या येत्या विशेष अधिवेशनासाठी हा व्हिप जारी केला आहे. संसदेचे विशेष अधिवेशन 18 ते 22 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. काँग्रेसने गुरुवारी पक्षाचा व्हिप जारी केला. पक्षाच्या सर्व खासदारांना या अधिवेशनासाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भाजपने आपल्या व्हिपमध्ये महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा करण्यासाठी आणि सरकारच्या बाजूने समर्थन देण्यासाठी सर्व खासदारांना संसदेत उपस्थित राहावे, असे म्हटले आहे.