संस्कृती मंत्रालय, केंद्र सरकार, संगीत नाटक अकादमी, नवी दिल्ली यांनी कला व संस्कृती संचालनालय गोवा सरकार आणि कला अकादमी गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 10 ते 12 फेबु्रवारी रोजी अमृत युवा कला उत्सवाचे आयोजन कला अकादमीच्या संकुलात करण्यात आले आहे.
संगीत, नृत्य व नाट्यावर आधारित अशा तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचा सविस्तर कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.
दि. 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वा. कृष्णकक्षात शारंगदेव, कालिदास, अभिनवगुप्त आण भरत मुनी यांच्यावर आधारित परिसंवाद तर दि. 12 फेबु्रवारी रोजी सकाळी 11 वा. कृष्णकक्षात कला समीक्षा या विषयावर आधारित कार्यशाळा होणार आहे. त्याचप्रमाणे दि. 10 ते 12 फेब्रुवारी रोजी सायं. 6 वा. दीनानाथ मंगेशकर कला मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी रसिकांनी या अमृत युवा कलोत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.