‘एक देश, एक निवडणूक’साठी समिती स्थापन

0
16

अध्यक्षपदी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची निवड

मोदी सरकारने ‘एक देश, एक निवडणूक’साठी समितीची स्थापना केली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली आहे. ‘एक देश, एक निवडणूक’ घेता येईल का याचा अभ्यास करण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे.

‘एक देश, एक निवडणूक’ या मुद्द्याचे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने समर्थन करत आले आहेत. आता मोदी सरकारने त्याबाबत पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने गुरुवारी या संदर्भात एक निर्णय जाहीर केला असून, त्यानुसार रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. एक देश, एक निवडणूक हे तत्व देशात प्रत्यक्षात अंमलात येऊ शकते का? शक्य असल्यास त्यासाठी कोणत्या तरतुदी, उपाययोजना कराव्या लागतील या संदर्भात आढावा घेऊन शिफारशी करण्याची जबाबदारी या समितीकडे सोपवली आहे.