राज्यात चोवीस तासांत आणखी एका कोरोना बळीची नोंद झाली असून, राज्यातील कोरोना बळींची संख्या ३८४५ एवढी झाली आहे. नवीन ११६ कोरोनाबाधित आढळून आले असून, एका कोरोनाबाधिताला इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या ७९३ एवढी झाली आहे. चोवीस तासांत आणखी १३५ बाधित कोरोनामुक्त झाले असून, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१५ टक्के एवढे आहे.